गेवराई, दि. 18 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील रेवकी देवकी येथील एका दहा वर्षीय अपंग मुलीवरच जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.18) दुपारी अडीच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास या प्रकरणात गेवराई पोलीसांकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती, याबाबत एपीआय संदीप काळे यांनी माहिती दिली आहे.
रेवकी देवकी येथील एका 45 वर्षीय नराधमाने रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी जन्मदात्या अपंग मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर सायं.5 च्या दरम्यान ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली. पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी गेवराई पोलीस ठाण्याचे संदीप काळे यांनी भेट दिली होती. या प्रकरणातील निर्दयी बापाला गेवराई पोलीसांनी अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.