दिंद्रुड ( लोकाशा न्युज )
माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजे दरम्यान घडली.
डॉ. दत्ता फपाळ वय 40 वर्ष (रा.बेलुरा ता.माजलगांव)मयत डॉक्टरचे नाव असून ते सकाळी मित्रांसमवेत माजलगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान तळ्यात दमछाक झाली असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. घटनास्थळी माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे सह माजलगाव पोलीस दाखल झाले असून पाणि जास्त प्रमाणात असल्याने प्रेत सापडत नसल्याने बीड येथील एन डि आर फ चे पथक घटनास्थळी येत असल्याची माहिती आहे. डॉ. फपाळ हे यांचा तेलगाव येथे दवाखाना असून तेलगाव परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.