कारवाई
दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 17:45 वाजता नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौसाळा गावातील प्रशांत उर्फ बबलू शिंदे रा. जैन नगर चौसाळा याच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याच्या साठ्यावर छापा मारला असता तेथे अवैद्यरित्या गोवा राजनिवास,आर एम डी,विमल कंपनीचा गुटखा साठवून त्याची विक्री करताना आढळून आला या छाप्यादरम्यान एकूण 4, 47, 348/- रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यामध्ये आरोपी प्रशांत उर्फ बबलू रेबननाथ शिंदे रा.जैन नगर चौसाळा तालुका जिल्हा बीड यांच्याविरुद्ध भादवी कलम 328 ,188 ,272, 273 प्रमाणे नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अमलदार किशोर गोरे, पोलीस अमलदार विनायक कडू, पोलीस अमलदार बालाजी बास्टेवाड वाड, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली आहे.