Uncategorized

अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, देशाची भावी पिढी घडवणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांचा गेल्या चार वर्षापासून सेवासमाप्ती लाभ थकला, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचा जिल्हा परिषदेवर धडकला प्रचंड मोर्चा



बीड । प्रतिनिधी
अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा, देशाची भावी पिढी घडवणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांचा गेल्या चार वर्षापासून सेवासमाप्ती लाभ थकला असून तो तत्काळ द्यावा, वेतनश्रेणी व अन्य लाभ लागू करावेत, पुर्ण वेळ कर्मचारी घोषित करुन 21 हजार रुपये किमान वेतन लागू करावे. राज्य शासनाने मानधनात ऑक्टोबर 2017 मध्ये वाढ केली होती. दरम्यान महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, तरी मानधनात भरीव वाढ करावी. सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या मानधनातील तफावत कमी करावी. अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागू करावे ती त्यांच्या किमान वैयक्तीक गरजा भागाव्यात इतकी म्हणजे शेवटच्या मानधनाच्या निम्मी द्यावी यासह विविध महत्वाच्या मागण्या घेवून मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचा नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, बीड जिल्हाध्यक्ष कमलताई बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, बीड जिल्हा संघटक सचिन आंधळे यांनी केले.
गेल्या कित्येक महिन्यापासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचा सातत्याने अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवत आहे. दि. 23/02/2022, व दि.06/04/2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे कृति समितीच्यावतीने धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सदर मोर्चाच्या शिष्टमंडळाशी मा. महिला व बालविकास मंत्री व मा. प्रधान सचिव, कुंदन मॅडम, महिला व बालविकास विभाग यांनी विविध मागण्यावर सविस्तर चर्चा केली. सदर मागण्या मंजुर करण्याचे त्यांनी ठोस आश्वासन दिले. परंतु अदयाप मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मनात शासनाप्रति तिव्र नाराजी निर्माण होत आहे. आपल्या मागणी मान्य व्हाव्यात यासाठी मंगळवार दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जबरदस्त मोर्चाचे काढण्यात आला. सदर मोर्चा भगवानबाबा प्रतिष्ठान बार्शी रोड, बीड येथुन छत्रपती शिवाजी चौक मार्गे नवीन जिल्हा परिषदेसमोर धडकला. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी शासनाप्रति प्रचंड रोष व्यक्त केला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद महिला व बालकल्याणचे अतिरिक्त सिईओ चंद्रशखर केकाण यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या कामकाजाकरीता नविन मोबाईल फोन घेण्यासाठी मा. आयुक्त यांनी प्रति अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तो त्वरीत मंजुर करावा, दैनंदिन कामकाजासाठी मराठीतील चांगला निर्दोष ऍप प्रत्येक गावात व वस्तीत चांगली कनेक्टिविटी व मानधनाला जोडुन डेटा रिचार्जची योग्य रक्कम द्यावी, कोणत्याही परिस्थिीतीत कर्मचार्‍यांना खाजगी वैयक्तिक मोबाईलवर शासकीय काम करण्यास भाग पाडु नये. जोपर्यात नवीन मोबाईल फोनसाठी पैसे व मराठीत पोषण ट्रैकर अ‍ॅप दिला जात नाही तोपर्यंत रजिस्टर्स मध्ये माहिती अदययावत करण्याचे अंगणवाडी सेविकाकडुन चालु राहील, मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्त्यात किमान 2000 व 1000 अशी वाढ करावी, गणवेशासाठी दिली जाणारी रक्कम वाढलेल्या महागाईच्या मानाने अत्यंत अपुरी आहे. तरी गणवेशासाठी वार्षिक 2000 रुपये रक्कम मंजुर केली जावी.
अंगणवाडीच्या मदतनिस व सेविकांच्या तसेच मुख्य सेविका व प्रकल्प अधिकार्‍यांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज करण्यात व त्यात निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तरी सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात यासह महत्वाच्या अन्य मागण्या घेवून मंगळवार दि. 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचा नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, बीड जिल्हाध्यक्ष कमलताई बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, बीड जिल्हा संघटक सचिन आंधळे यांनी केले. यावेळी बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, वडवणी, माजलगाव, धारुर, परळी, अंबाजोगाई या तालुक्यातल अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट…
तुटपुंजा मोबदल्यावर अंगणवाडीताई आणि मदतनिस यांना आपले नेमुन दिलेल्या कामासह शासन, प्रशासन केव्हाही कोणतीह कामे सांगतात, त्यांच्याकडून ते कामे करुन घेतले जातात. देशाची भावी पिढी घडवणार्‍या अंगणवाडी सेविकांना वेळावेळी विविध अतिरिक्त कामे लाधले जातात. मात्र त्यांना अद्यापही शासकिय कर्मचार्‍यांचा दर्जा दिला गेला नाही. त्यासाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून शासन, प्रशासन दरबारी आवाज उठवत आहोत. मात्र आता आमचा अंत संपला असून येणार्‍या काळात तिव्र आंदोलन बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मतदनिस यांना सोबत घेवून करु
-भगवानराव देशमुख
प्रदेशाध्यक्ष

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!