Uncategorized

सणासुदीतही शालेय पोषण आहार कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष, बीड जिल्ह्यातील कामगारांचे चार महिण्याचे मानधन थकले, मुख्यमंत्री साहेब आता तरी कामगारांकडे लक्ष देतील का ? कॉ. डॉ. अशोक थोरात यांचा सवाल


बीड, दि. 7 (लोकाशा न्यूज) : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक, अनुदानित संस्थांमध्ये मध्यान्ह भोजन देण्यार्‍या शालेय पोषण आहार कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्यांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांकडे लक्ष देऊन त्यांच्या प्रलंबीत मागण्या मान्य कराव्यात, असे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटेनचे राज्य सचिव कॉ.डॉ. अशोक थोरात यांनी म्हटले आहे.
राज्यातील जि.प.प्रा.शाळा, माध्यमिक शाळा, अनुदानित संस्था आश्रम शाळा यामध्ये मध्यान्ह भोजन देणार्‍या महिला कामगार सन 2003 पासून अंत्यत कमी मानधनावर काम करतात. त्यांचा शाळेमध्ये पाणी आणणे, तांदुळ साफ करणे, खिचडी शिजवणे, मुलांना वाटप करणे, शाळेचा परिसर स्वच्छ करणे, वर्ग स्वच्छ करणे, शाळेच्या परिसरातील गवत काढणे, झाडांना पाणी देणे, भांडी धुणे इत्यादी सह अनेक कामे या कामगारांना करावी लागतात. यामध्ये विधवा, परितक्ता, घटस्फोटीत, दलीत, ओबीसी, गरीब घरातील गरजु महिला काम करतात. त्यांना 50 रूपये रोज दिला जातो. 50 से. रोजा प्रमाणे 1500 महिना मानधन दिले जाते. साहेब त्यांना 1500 रुपये महिन्यामध्ये महिना कसा भागवायचा हा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. आणि तोही मानधन वेळेवर भेटत नाही. एप्रिल, मे, जुलै, ऑगस्ट महिन्याचे मानधन आणखी त्यांना भेटले नाही. गौरी गणपतीच्या सणाला सुध्दा महाराष्ट्रातील एकाही महिला कामगारांना मानधन भेटले नाही. साहेब तामिळनाडू राज्यात 11,000 रुपये व हरियाना राज्यात 7000 हजार रुपये मानधन आहे. आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1500 रूपये मानधन दिले जाते. तरी मुख्यमंत्री साहेब याकडे आपण लक्ष घालून कामगारांच्या मानधनात वाढ करावी, असे शालेय पोषण आहार कामगाराला आपल्या कडून अपेक्षा आहे. असे दिलेल्या प्रसिध्दी पत्राकात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य सचिव डॉ . अशोक थोरात यांनी माहिती दिली.

तामिळनाडूत आकरा हजार तर आपल्या पुरोगामी
महाराष्ट्रात फक्त दिड हजार रूपये मानधन
साहेब तामिळनाडू राज्यात 11,000 रुपये व हरियाना राज्यात 7000 हजार रुपये मानधन आहे. आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये 1500 रूपये मानधन दिले जाते. तरी मुख्यमंत्री साहेब याकडे आपण लक्ष घालून कामगारांच्या मानधनात वाढ करावी, असे शालेय पोषण आहार कामगाराला आपल्या कडून अपेक्षा आहे. असे दिलेल्या प्रसिध्दी पत्राकात महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य सचिव डॉ . अशोक थोरात यांनी माहिती दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!