परळी ।दिनांक ०६।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विविध गांवच्या सेवा सहकारी सोसायटींच्या विजयी संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. निवडणूका झालेल्या सुमारे ऐंशी टक्के सोसायट्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत, हा विजय म्हणजे भविष्यातील यशाची नांदी आहे असं त्यांनी सांगितलं.
परळी मतदारसंघातील खोडवा सावरगांव, सेलू परळी, ममदापूर-बोरखेड, कौडगाव हुडा, कातकरवाडी, कुसळवाडी आदी गावच्या सेवा सहकारी सोसायटीवर विजयी झालेल्या नवनिर्वाचित संचालकांनी तसेच संबंधित गावातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांनी आज पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन आभार मानले.यावेळी या सर्व विजयी संचालकांचा पंकजाताईंनी सत्कार करून अभिनंदन केले. विविध ठिकाणचा हा विजय भविष्यातील यशाची नांदी आहे असं सांगत निवडणूकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला व त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या.
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उत्तमराव माने, अंकुशराव दहिफळे, बालाजी दहिफळे, गणेश कराड, बंडू चाटे, गंगाधर सातपुते, तुकाराम गव्हाणे, प्रभाकर कदम, राजाभाऊ कातकडे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
••••















