Uncategorized

पैठण – बारामती रोडवर एकाच दिवशी दोन आपघात, गितेवाडी फाट्याजवळ चार चाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी, नातेवाईकांचे सांत्वन करून परतणाऱ्या पती – पत्नीवर काळाचा घाला, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

आष्टी, दि. 3 ( लोकाशा न्युज) पैठण- बारामती रस्त्यावर काल दि. 2 सप्टेंबर रोजी दोन अपघात झाले या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. पहिला अपघात हा शुक्रवार रोजी सकाळी 7 : 30 वा. च्या सुमारास खाकाळवाडी परीसरात झाला. या अपघातात पिता- पुञ जागीच ठार झाले. तर दुसरा अपघात गितेवाडी फाट्या नजीक झाला. यामध्ये पती जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली असुन तीच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
गितेवाडी फाट्यावर झालेल्या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, खाकाळवाडी येथिल महादेव पाराजी साप्ते यांच्या मावसभावाचे निधन झाल्याने ते पत्नीसह धामणगांव येथे मावस भावाच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. जातांना ते मावस भावाच्या कुटूंबियांसाठी जेवणाचा डब्बा घेऊन गेले होते. महादेव साप्ते आणि त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी मयत मावस भावाच्या कुटूंबियांसह राञी जेव केले व ते गावी खाकाळवाडी येथे येण्याची निघाले. शुक्रवार राञी 9 :00 वा च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला कड्यावरून धामणगांव कडे जाणार्या अज्ञात चार चाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात पती महादेव पाराजी साप्ते हे जागीच ठार झाले तर पुष्पा महादेव साप्ते या गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. संबंध चार चाकी अपघातानंतर निघून गेली आहे. एकाच दिवशी पैठण – बारामती रोडवर दोन अपघात झाल्याने या रोडवरून प्रवास करणार्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!