दिंद्रुड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर आत्याचार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. दरम्यान पिंक पथकाकडे घटनेचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी अटक करण्यात आला आहे. दिंद्रुड पोलीस हदयातील गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे.
सदर प्रकरणातील अल्पवयीन मुलीवर गेल्या एक वर्षापासून अत्याचार होत होता, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशी लग्न करतो म्हणत सदर पीडितेवर गेल्या एक वर्षभरात अनेकदा अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. यात ती गर्भवती राहिली. सोमवारी माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात तिची प्रसूती झाली. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पिंक पथकाला या घटनेची माहिती दिली. पिंक पथकातील पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे व माया मस्के यांनी चौकशी करत सदर प्रकरणातील आरोपी सागर कपिल सोनकांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पीडिता अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघड झाल्यामुळे बाललैंगिक अत्याचार अधिनियम कायद्या अंतर्गत या घटनेतील आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळें सह माया मस्के,राम शिनगारे, करत आहेत.















