बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : माणसाला आपल्या जीवनात कधी कोणत्या आजाराला तोंड द्यावे लागेल हे निश्चित सांगता येत नाही, अगदी खेळण्याच्या वयातच आवरगाव (ता.धारूर) येथील गोविंद सुदाम नखाते याला किडणीच्या आजाराने गाठले, त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. तो सध्या औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, आता त्याला त्याची आई किडणी देणार आहे, आईची किडणी मॅचही झालेली आहे, मात्र किडणी टान्सफरसाठी मोठा खर्च लागणार आहे, जो की गोविंद आणि त्याचे कुटूंबिय उचलू शकत नाहीत, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला वाचविण्यासाठी दानशुर व्यक्तींना त्याला आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. दानशुरांच्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचू शकतात. त्यामुळेच माणूसकीच्या नात्याने त्याला दानशुरांनी मदत करायलाच हवी.
सोशल मिडीयावर त्याने एक पोष्ट शेअर करून दानशुर व्यक्तींना आवाहन केले आहे. ‘मी गोविंद सुदाम नखाते, मी माझ्या वैद्यकीय खर्चासाठी निधी उभारत आहे. मी माझ्या किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यामुळे त्रस्त आहे आणि मी औरंगाबादच्या कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. सदरील हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सफरसाठी आवश्यक असलेली एकूण रक्कम गोळा करण्यासाठी आम्ही सर्व काही केले आहे, परंतु सर्व वैद्यकीय खर्चासाठी रु.1000000 अधिक आवश्यक आहेत. आवश्यक रक्कम खूप मोठी असल्याने, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया माझ्या उपचारासाठी योगदान द्या आणि या गरजेच्या वेळी मला मदत करा, प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे! कृपया देणगी बटणावर क्लिक करून आणि हे पृष्ठ आपल्या मित्र आणि कुटुंबासह सामायिक करून ही रक्कम वाढविण्यात मला मदत करा. तुमच्या मदतीबद्दल आणि शुभेच्छांसाठी मी कृतज्ञ असल्याचे त्याने आपल्या पोष्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान ज्या दानशुर व्यक्तींना त्याला मदत करायची आहे ते ‘ गोविंद सुदाम नखाते रा.आवरगाव ता. धारूर जि. बीड (मो.नं. 7038702342), स्टेट बँक ऑफ इंडिया खाते नंबर-62256721316, आयएफसी कोड 0020032, फोन पे नंबर 7038702342 या क्रमांकावर मदत पाठवू शकतात.