केज, दि. 27 (लोकाशा न्यूज) : एका 14 वर्षीय मुलीस आमिष दाखवून तिला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यास 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केज तालुक्यातील एक गावातून इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय मुलीस 19 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. या प्रकरणी 20 जुलै रोजी अज्ञाताविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता त्या अल्पवयीन मुलीस प्रभू उर्फ बाळू बळीराम कोल्हे याने पळवून नेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजेश पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 27 ऑगस्ट रोजी प्रभू उर्फ बाळू कोल्हे याला त्याच्या रहात्या घरातून ताब्यात घेतले. त्याने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. प्रभू उर्फ बाळू कोल्हे याच्याविरुद्ध कलम 376 (2) (एन) यासह बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4(2) 8(12) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंक पथकाच्या प्रमुख फौजदार सिमाली कोळी तपास करीत आहेत.