बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : जनावरांना कत्तलीसाठी घेवून जाणारा टेम्पो पकडून त्यातील 17 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत पाच लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केजमधील कळंब चौकात केली आहे.
25 ऑगस्ट रोजी सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळाली की परळी येथील व्यापार्यांनी साळेगाव आठवडी बाजारातून आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 04 ऋग 9641) मध्ये लहान-मोठे 17 जनावरे भरून कत्तल करण्यासाठी केजमार्गे परळी येथे घेऊन जात आहेत. सदरची माहिती त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार यांना देऊन सदर वाहनावर व जनावरे मालकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी सदरचे वाहन साडे सहा वाजता केज येथील कळंब चौकात पकडून वाहन चालकास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अमजद सत्तार तांबोळी (रा. केज) व जोडीदार गौतम मनोहर कांबळे (रा. परळी) यांना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातील आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये लहान मोठे 17 गोरे जनावरे मिळून आले. त्यांना सदरची जनावर कोठून व कोणाचे सांगण्यावरून भरले असे विचारले असता त्यांनी सांगितले की परळी येथील व्यापारी जुबेर कुरेशी,मोहसीन कुरेशी,सोमनाथ ताटे यांच्या सांगण्यावरून साळेगाव येथील आठवडी बाजारातून भरून परळी येथे घेऊन जात आहोत असे सांगितले सदर वाहनातील 17 लहान मोठी गोरे जनावरांची किमती अंदाजे 265000 रुपये आयशर टेम्पो किमती अंदाजे 300000 रुपये असे एकूण 565000 रुपयांचा माल जप्त करून वरील 5 आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मुकुंद ढाकणे, बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भंडाने यांनी केली आहे.