Uncategorized

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ‘त्या’ रस्त्यांची दैना फिटणार, सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्याचा दिल्या सूचना

बीड । दि. २३ ।
बीड जिल्ह्यातील केज आणि शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि नवीन कामांच्या मंजुरीसाठी केंद्रीय बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना केल्या आहेत.

शिरूर तालुक्यातील वारणी ते बांगरवाडी आठ किमी रस्ता, घोगस पारगाव ते चकलांबा रस्ता,सात किमी, पांढरवाडी फाटा ता.पाटोदा ते चिंचपूरी इसदे रस्ता जिल्हा हद्द, तींतरवणी ते चकलांबा रस्ता, सात किमी, हे रस्ते केंद्रीय रस्ते निधीतून करण्यासाठी व केज, वडवणी बीड तालुक्यातील जिवाचीवाडी, सोनाखोटा, नाथापूर रस्त्याचे मजबूतीकरण व आरसीसी रस्ता करणे, तसेच रस्ता व नाल्यावरील पूल बांधकामाच्या निधी मागणीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या रस्त्यांची खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे दैना फिटेल आणि या भागातील दळणवळण व्यवस्था सुलभ होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरीकांकडून व्यक्त होते आहे.

•••••

•••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!