Uncategorized

विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणाच्या अधु-या लढ्याला बळ देऊ, पंकजाताई मुंडे यांनी शोकसभेत वाहिली मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली

बीड ।दिनांक १५।
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या अधु-या लढ्याला आगामी काळात बळ देणार आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी श्रध्दांजली अर्पण करतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, मेटे यांचे नेतृत्व प्रस्थापितांच्या नव्हे तर एका सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेला उमदा चेहरा होता. त्यांची अशी एक्झीट होईल असे वाटले नव्हते. त्यांचे आणि माझे ऋणानुबंध राहतील. आमच नातचं अस होतं, कधी आम्ही भांडायचो पण कधी तेवढीच मैत्री असायची. आमची भेट ठरली होती. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेट घेणार होतो पण त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली याची मला कायम रूखरूख राहील असे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळ व्हावे अशी त्यांनी आग्रही मागणी केलेली होती. मराठा आरक्षणासाठी ते सदैव लढले. आरक्षणाच्या त्यांच्या अधु-या राहिलेल्या लढयाला आम्ही बळ देऊ या त्यांच्या वक्तव्याला शोकसमुदायातील उपस्थित कार्यकर्त्यांनी दाद दिली. महाराष्ट्र एका स्वाभिमानी आणि चळवळीतील नेत्याला मुकला आहे, अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!