Uncategorized

विनायकरावांनी जे जे काम हाती घेतले होते ते ते पूर्ण करू – उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्र्यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून वाहिली श्रद्धांजली


बीड,
स्वत:च्या भरश्यावर उभं राहिलेले हे नेतृत्व सातत्याने दुसर्‍यांसाठी काम करत राहील. जे काम मागायचं ते समाजासाठी मागायचं स्वत:साठी काही मागायच नाही आसा निर्मळ आणि निस्वार्थी मित्र मी गमावला आहे. मेटेंच्या जाण्याने वयक्तीक दृष्ट्या माझी सर्वात मोठी हाणी झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी म्हटले.
शिसवंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचे काल अकाली अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज बीड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रधांजली आर्पण करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले काय बोलाव शब्द सुचत नाहीत. पर्वा रात्री सव्वा दोन वाजता त्यांचा मला एसएमएस आला होता. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचे त्यांनी म्हटले. उद्या आपण बोलू असेही त्यांनी त्यामध्ये म्हटलं होत. मात्र काल त्यांचा अपघातात दुदैवाने मृत्यू झाला. वयक्तीक दृष्ट्या ही माझी सर्वात मोठी हाणी आहे. ते आत्यंत जवळचे मित्र होते. 15 दिवसात एकदा तरी आम्ही भेटायचो, चर्चा करायचो. स्वत:साठी कधीही काहीही ते मागत नव्हते. जे मागायचे ते समाजासाठी मेटेंचं नेतृत्व हे स्वत:च्या भरवश्यावर उभ राहिलेल नेतृत्व होत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. विनायकरावांनी जे जे काम हाती घेतले होते. ते पूर्ण करण्याचा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!