बीड (प्रतिनिधी) शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. ही पोकळी कधीही भरुन येणार नाही.विनायकराव मेटे यांच्या पार्थीवावर उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी बीड शहरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून सर्व व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी नमुद केले आहे की, बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते, माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची मोठी हानी झाली आहे. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. सामाजिक विषयांवर आवाज उठवणार्या नेत्याला संपूर्ण राज्य मुकले आहे.त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्यांनी केले आहे.