Uncategorized

आंतरजातीय प्रेमविवाहानंतर बीडच्या डॉक्टर तरूणीची आत्महत्या, पाच पानांची लिहली सुसाईड नोट


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : आई आणि बाबा, मला माफ करा. मी त्याच्यावर प्रेम करायची, पण तुमच्या पेक्षा जास्त नाही. मी त्याला लग्नासाठी नाही म्हणत होते पण त्याने मला धमकावून बोलावले. त्याने फसवले आणि मी फसले. आता ही मला मरायचे नव्हते पण मी जे केले त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आणि आता मला एकट्याने समाजाला सामोरे जाण्याचा त्रास होत असल्याचे सांगत डॉक्टर असलेल्या वर्षाने आत्महत्या केली आहे. वर्षा ही बीड येथील तर तिचा पती गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील रहिवाशी आहे.

औरंगाबाद येथील 3 महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या डॉक्टर मुलीची पाच दिवसांपूर्वीच आत्महत्येसाठी स्वतःच इंजेक्शन घेतले, तेव्हापासून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या डॉक्टरचा घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी आज दि 9 रोजी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी पती, सासू, दीरा यांच्यासह सासर्‍यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आहे. या डॉक्टर विवाहितेच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.वर्षा अंबादास व्यवहारे (25)आणि अभियंता धनंजय वसंत डोंगरे (रा.सावरगाव पोखरी,जि.गेवराई,जि.बीड,ह.मु. सरोदे कॉलनी,रेल्वे स्टेशन. मुलाच्या घरच्यांच्या विरोधामुळे दि 2 मे 2022 रोजी आळंदी येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात प्रेमविवाह केला होता. धनंजय पैठण येथील कंपनीत आहे तर डॉ.वर्षा या शहरातील एका खासगी रुग्णालयात नौकरी करीत होत्या. लग्नानंतर वर्षाच्या कुटुंबीयांनी स्वीकारलेल्या डॉक्टर वर्षला सासू सिंधुबाई, सासरे वसंत डोंगरे आणि दीर बाप्पा यांनी काही दिवसांतच पतीसह वर्षा हिला त्रास देण्यास सुरुवात केली. डॉ.धनंजयला पुन्हा लग्न करायचे आहे कारण तु आमच्या जातीची नाहीस, म्हणून तु त्याला सोडून जा, त्यात ती गरोदर राहिल्याने सासू तिला सतत मारहाण करत होती. डॉ.वर्षा यांनी दि 30 जुलै रोजी महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली आणि धनंजयच्या सतत मारहाणीची त्याच्यावर क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यामुळे आज एक डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. तिच्या पतीसोबत भांडण झाल्याने दि 3 ऑगस्ट रोजी रात्री डॉ.वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करून 2 हजार मि.मी. इन्सुलिन औषधाची ही मात्रा शिरामध्ये इंजेक्शनद्वारे घेतली जाते. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. डॉ.वर्षी त्यांच्या बहिणीला तिच्या पतीने सांगितले की ती फोन उचलत नाही. नातेवाईकांना बोलावले. कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते पहाटे बीड येथून औरंगाबादला आले होते.त्यांनी डॉ.वर्षा यांना दि 4 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉ.वर्षा शुद्धीवर आल्याच नाहीत, खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्यामुळे 2 दिवसांपूर्वी तिच्या पालकांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते घाटीत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी वर्षा यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहेत. पाच पानी सुसाईड नोट डॉ.वर्षा यांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्यापूर्वी पाच पानी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात पती धनंजय, सासू,सासरे,दीर हे माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. प्रेमाच्या नावाखाली पतीने फसवणूक केल्याचे लिहिले आहे. लग्नानंतर सासरची मंडळीनी त्यांचा कसा छळ केला आहे. त्याही लिहिले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!