Uncategorized

ग्रामसेवक संघटनेच्या बीड जिल्हा सल्लागारपदी
बाळासाहेब झोंबाडेंची निवड


बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 च्या बीड जिल्हा सल्लागार पदी आवरगावचे ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाभरातून कौतूक केले जात आहे.
एक सकारात्मक विचार डोळ्यासमोर ठेवून ग्रामसेवक बाळासाहेब
झोंबाडे हे काम करत आहेत. त्यांच्या याच सकारात्मक कामामुळे आवरगाव बीड जिल्ह्यात आदर्श ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 च्या बीड जिल्हा सल्लागार पदी झोंबाडेंची निवड करण्यात आली आहे. या संघटनेची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली आहे. त्यानुसार मधुकर शेळके जिल्हा अध्यक्ष, अविनाश राठोड जिल्हा सरचिटणीस, बापू जगताप कार्यध्याक्ष, श्रीमती दिपाली गायकवाड महिला उपाध्यक्ष, श्रावण चव्हाण उपाध्यक्ष, दिलीप मिसाळ उपाध्यक्ष, मुकेश भस्मारे उपाध्यक्ष, सुधाकर गायकवाड उपाध्यक्ष, साहेबराव चव्हाण कोषाध्यक्ष, दिपक बांगर सह सचिव, ग्यानदेव खरात जिल्हा संघटक, बाबासाहेब कुडके जिल्हा संघटक, दत्तात्रय लोमटे जिल्हा संघटक, बाळू झोंबाडे कायदे सल्लागार, विजयकुमार गायसमुद्रे प्रसिद्धी प्रमुख काम पाहणार आहेत. जिल्हा नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया माजी जिल्हाध्यक्ष बळीराम ( आण्णा ) उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली, मा.भगवानराव तिडके माजी जिल्हा सरचिटणीस, मा. दिपक जोगदंड निवडणूक निर्णय अधिकारी व मा. बाबुराव नन्नवरे साहेब सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चेअरमन ग्रामसेवक पत संस्था, राज्य कौन्सील सखाराम काशिद व रविंद्र हावळे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पाडली. या सर्व नुतन कार्यकारणीचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!