Uncategorized

टॅक्टरच्या अपघात दोन रेल्वे कामगार मजुर ठार

अंमळनेर( लोकाशा न्युज ) अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील हातोला शिवारात असणाऱ्या देवीच्या मंदिर परिसरातील खिंडीत ट्रॅक्टरच्या अपघातात दोन रेल्वे कामगार ठार झाल्याची घटना गुरुवार 4 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली असुन मयत हे बिहार राज्यातील आहेत.

बीड अहमदनगर रोडवर हातोला शिवारात असणाऱ्या खिंडीत रेल्वेचे लोखंड घेऊन येणारा ट्रँक्टर पलटी झाला यात ट्रॅक्टर मध्ये बसुन येत असलेले रेल्वे कामगार सरलराम देनिराम वय 49 रा.रापी.ता.फुलविरा,जि.गोपालगंज.राज्य बिहार.व मनोजकुमार दृपदेव पांडे वय 34रा.बन्सीबत्राल,रा.रापी.ता.फुलवीरा.जि.गोपालगंज .राज्य बिहार यांच्या अंगावर ट्रॅक्टर मधील लोखंड पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.तर ट्रॅक्टर चालक मयुर ज्ञानदेव घोरपडे
रा.शिंगवे.ता.पाथर्डी.जि.अहमदनगर .व ठेकेदार प्रमोद कुमार सुरेश यादव हे बालंबाल बचावले आहेत.

हातोला परिसरात झालेल्या अपघातात ठार झालेल्या रेल्वे कामगारांचे पीएम हे अंमळनेर आरोग्य केंद्रात अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ परमेश्वर बडे यांनी शुक्रवारी केले .पीएमसाठी त्यांना शिपाई क् ष्णा भोये व नवनाथ गाडे यांनी मदत केली होती .

दोन्ही मृतदेहाची डेथ बॉडी हि रेल्वे कामाला मजुर पुरवणारे ठेकेदार प्रमोद कुमार यादव वय 22 ता.ठकुरी.चेक पोस्ट मिस्त्रीपत्राल ता.फुलवीरा .जि.गोपालगंज यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या होत्या .
या प्रकरणाचा पुढील तपास हा अंमळनेर पोलीस करत असुन ट्रँक्टर चालक मयुर ज्ञानदेव घोरपडे रा.शिंगवे केशर ता.पाथर्डी.जि.अहमदनगर यांच्यावर अंमळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळा वरुन फरार झालेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!