Uncategorized

हनुमानगडाच्या मठाधिपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

जामखेड, प्रतिनिधी : ५ आॅगस्ट :
पाटोदा, जिल्हा बीड तालुक्यातील, हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल मोहरी ता जामखेड जि अहमदनगर येथील महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे रा. सावरगाव घाट हनुमान गड, ता. पाटोदा जि.बीड याने जून ते २०२२ ते दिनांक १२ /७ /२०२२ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास फिर्यादी महिला यांना सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच संमतीशिवाय यातील बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आरोपी बुवासाहेब खाडे विरोधात भा. द. वि. कलम. 376 (N),506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा काल दि. ४ आॅगस्ट २०२२ रोजी रात्री ११ : : ३० वा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!