पाटोदा : लोकाशा न्यूज
काही दिवसांपुर्वी एका महिलेसोबतच्या काॅल रेकॉर्डिंगमुळे राज्यात चर्चेत आलेले हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज पुन्हा एकदा एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. भल्या पहाटे त्यांना काही लोकांनी मारहाण केल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे. नाजूक प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा जामखेड तालुक्यात आहे. याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे 29 रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याच दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते साडेपाच या वेळेत त्यांना मारहाण करण्यात आली. असुन आरोपींच्या विरोधात खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे