Uncategorized

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा – पंकजाताई मुंडे यांचं आवाहन, भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांना अभियानात सहभागी करून घ्यावं, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविण्यात येणार अभियान

परळी । दिनांक ०३।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी करून घ्यावं असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही तर आपल्या अस्मितेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देश भक्तीचा विषय आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले असून आज आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येत्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या अस्मितेचं प्रतिक असलेला तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्राभिमान बाळगावा. १५ ऑगस्ट रोजी आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन काही घरांना भेटी देणार आहे असं पंकजाताई मुंडे यांनी सांगितलं आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर तर तिरंगा फडकवावाच पण प्रभागातील प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घ्यायला सांगून अभियान यशस्वी करावं असे आवाहन पंकजाताईंनी केलं आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!