Uncategorized

बुलेटसह साडेतीन लाख घेऊन बीडमधील सराफा व्यापार्‍याचा नोकर पसार, बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल


बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : शहरातील सराफा व्यापारी गणेश मैड यांच्या दुकानावरील नोकराने रोख रकमेसह बुलेट घेऊन पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. तीन लाख 25 हजार रुपयांसह बुलेट गाडी घेऊन पसार झालेल्या करणं मुंडे याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील माळीवेस भागात गणेश मैड यांचे कैलास ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात तीन आठवडण्यापूर्वी करन मुंडे हा युवक नोकरीस लागला होता. मंगळवारी मैड यांनी शाळेतील आणि दुकानातील मिळून तब्बल तीन लाख 25 हजार रुपये रक्कम बँकेत भरण्यासाठी करन कडे दिली. बँकेत जाण्यासाठी त्याला स्वतःची बुलेट देखील दिली.मात्र तासाभराचा कालावधी उलटला तरी करन परतून न आल्याने मैड यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा बँकेत पैसे जमा झाले नसल्याचे कळले. त्यानंतर त्यांनी करनच्या गावाकडे जाऊन चौकशी केली मात्र तो तेथेही नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!