मंजरथ, दि.29:- धार्मिक विधीसाठी सुप्रसिद्ध असलेले ऐतिहासिक धार्मिक स्थळ श्रीक्षेत्र मंजरथ आहे. या गावामध्ये दोन नद्यांचा संगम होत असल्याने तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी विधी करण्यासाठी दाखल होतात. मात्र एवढे सर्व काही असतांना येथील गावात जाण्यासाठी नागरीक तारेवरची करसत करत जीव मुठीत धरून गाव गाठावे लागत. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच नागरिक कळत नसल्याने येथील वैतागलेल्या नागरिकाकडून नाथसागरातून सोडण्यात आलेल्या 19 हजार क्युसेस पाण्यावर जल समाधी आंदोलन सूरु केले आहे. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांवर आशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ आली असून यावर प्रशासन काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजलगाव तालुक्यापासुन अकरा किलोमिटर मंजरथ हे गाव अाहे गोदातीरावरती बसलेल्या मंजरथचि लोकसंख्या 4000 आहे ऐतिहासिक वस्तुमुळे गावाला तिर्थ क्षैञ विकासाचा दर्जा प्राप्त आहे दक्षिन प्रयाग लक्ष्मी ञिविक्रराम मंदिर गोदातीरावती लहान मंदिरे अाहेत व धार्मिक विधि साठी लोक येतात पण गावाला येण्यासाठी सस्ताच राहिलेला नाहि त्यामुळै प्रशासनाच्या वारोधात गावकरी गोदावरीच्या नाथासागरच्या पाण्यावर गावकरी जिवघेणी जल समाधी अंदोलन करीत अाहैत अाता याकडे माञ प्रशासन काय निर्णय घेईल याकडे बिड जिल्हा वासियांचे लक्ष वेधले अाहे अंदोलन कत्ते भिमराव कदम,अाशोक शिंदे,बाळु काका बारहात्ते, संतोष वाघमारे, शुभाष थोरात ,विनोद वाघमारे अाकाश अास्वले ,भारत अास्वले, अादि सर्व गावकरी उपस्थित आहे.