Uncategorized

एसपींचा दणका ! गुटख्यात कांड करणार्‍या पाटोदा पोलिस ठाण्याच्या एपीआयसह अन्य दोन पोलिस कर्मचार्‍यांना केले तडकाफडकी निलंबित, लोकशाने प्रकरणाला फोडली होती वाचा


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात गुटख्याच्या व्यापाराला पोलिसांचे अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असतेच, त्यातच आता गुटख्याचा कंटेनर अडवायला पाठविलेल्या पोलिसांनीच कंटेनरमधील तब्बल 23 पोटे गुटखा पसार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्यासह तीन पोलिसांवर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसर्‍या बाजूने मात्र अनेक ठिकाणी गुटख्या व्यापार्‍यांना काही पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता पाटोदा येथील कारवाईत आल्याचे दिसत आहे. 4 दिवसापूर्वी पाटोदा परिसरात गुटख्यावर कारवाई करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना गुटख्याच्या कंटेनरची माहिती देऊन तो अडवायला सांगितले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील 50 पोते गुटख्याऐवजी कारवाईत केवळ 27 पोते दाखविला आणि 23 पोटे गुटखा हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केला. हि बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबन आदेशातच हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!