Uncategorized

कुटे ग्रुप डेअरीचे श्रीखंड, आम्रखंड ही बाजारात


बीड/प्रतिनिधी : तूप दूध दही व अन्य दुग्धजन्य पदार्थाच्या प्रचंड यशानंतर कुटे ग्रुप गुड मॉर्निंग डेअरीच्या वतीने श्रीखंड आम्रखंड बाजारात आणले असून ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील अशी ग्वही कुट ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे यांनी दिली आहे.
कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग डेरी च्या वतीने वर्षभरापूर्वी तूप, दूध, दही, लस्सी, ताक असे पदार्थ बाजारात आणले होते. या पदार्थांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला देशभरातील 26 राज्यांमध्ये हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर कुटे ग्रुप गुड मॉर्निंग डेअरीच्या वतीने आम्रखंड आणि श्रीखंड बाजारात आणले आहेत. गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये कोणतीही तडजोड न करता कुटे ग्रुपचे सर्व प्रॉडक्ट बाजारात आणले जात असल्याने ग्राहकही विश्वासाने तिरुमला एडीबल ऑइल, तिरुमला कोकोनट ऑइल, तिरूमला पशुखाद्य यासह अन्य प्रॉडक्टला उदंड प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासावरच आता कुटे ग्रुप गुड मॉर्निंग डेअरी च्या वतीने खास सणासुदीच्या काळात श्रीखंड आणि आम्रखंड बाजारामध्ये उतरविण्यात आले असून यालाही ग्राहक तसाच विश्वास दाखवून प्रतिसाद देतील असे कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई सुरेश कुटे यांनी म्हटले आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात कुटे ग्रुप सन्स डेअरीच्य श्रीखंड आणि आम्रखंड पदार्थाचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी यावेळी आर्यन सुरेश कुटे, अर्चनाताई सुरेश कुटे यांच्यासह कुटे ग्रुप मधील सर्व सदस्य उपस्थित होते.
चौकट
कुटे ग्रुप सन्स डेअरी च्या वतीने श्रीखंड आणि आम्रखंड ग्राहकांसाठी बाजारात आणले आहेत अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार आहेत. ग्राहकांनी आतापर्यंत जो विश्वास आमच्यावर दाखविला आहे. त्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ दिला जाणार नाही. श्रीखंड आणि आम्रखंड अत्यंत दर्जेदार आहेत. अर्चना सुरेश कुटे मॅनेजिंग डायरेक्टर कुटे ग्रुप

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!