Uncategorized

छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वातील लढ्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत,बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेच्यावतीने न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत, चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवले

समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखालील लढ्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत!
बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेच्यावतीने न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत
चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढ्यांचे केले वाटप!
बीड / प्रतिनिधी
समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा. छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखालील लढ्यास यश मिळाले असून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बीड जिल्ह्यामध्ये या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बीड शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले.
गाव खेड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी समाजातील विविध जातींना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणामुळे राजकारणात स्थान मिळत होते. मात्र न्यायालयाने इम्पेरिकल डाटा सादर करेपर्यंत ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणास स्थगिती दिल्याने गाव खेड्यातील ओबीसी समाज राजकारणापासून वंचित झाला होता. यासाठी महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आयोगाची निर्मिती करून ओबीसी समाजाचा इम्पेरियल डाटा न्यायालयात सादर करावा यासाठी समता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी आदी मागण्यासाठी ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी धरणे मोर्चे, रास्ता रोको निदर्शने अशा विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने बांठीया आयोग स्थापन करून राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरियल डाटा न्यायालयात सादर केल्याने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे बीड जिल्ह्यामध्ये समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करत, पेढे वाटप करत जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी समता परिषद आणि विविध ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार, छगनराव भुजबळ साहेब, समीरभाऊ भुजबळ, पंकजभाऊ भुजबळ यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत, परीट समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेशराव जगताप, सोनार समाजाचे ॲड. संदीप बेदरे, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष रफिक बागवान, शहराध्यक्ष निखिल शिंदे, राजू महूवाले, नितीन राऊत, सुशील जाधव, रणजीत पाटील, धनंजय काळे, नितीन नन्नवरे, मनोज भानुसे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी आणि ओबीसीतील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मोठा जल्लोष केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!