बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : कामातील चुकारपणा पुन्हा एखदा आरोग्य शिरूर आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका पी.एस. गोर्डेंना भोवला आहे. अजित कुंभार यांच्यानंतर सीईओ अजित पवार यांनीही गोर्डेंना तडकाफडकी सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांचे परळी हे मुख्यालय असणार आहे.
कामातील कुचराईपणा, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, वरिष्ठांना उदटपणे बोलणे यासह अन्या कारणास्तव तत्कालिन सीईओ अजित कुंभार यांनी आरोग्य सेविका पी.एस. गोर्डेंना सेवेतून निलंबित केले होते, कुंभार यांनी 2019 मध्ये ही कारवाई केली होती, त्यावेळी त्या कुंठेफळ याठिकाणच्या आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्यांची विभागीय चौकशीही सुरू आहे. कुंभार यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले, त्या सध्या शिरूर येथील आरोग्य उपक्रेंद्रात कर्तव्य बजावत होत्या. एखदा कारवाई होवूनही शिरूरमध्ये त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा केली नाही, कामातील हाच कुचराईपणा त्यांना पुन्हा एखदा आरोग्य सेविका पी.एस. गोर्डेंना भोवला आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार सोमवारी सीईओ अजित पवार यांनी गोर्डे या आरोग्य सेविकेस सेवेतून तडकाफडकी निलंबित केले आहे. सीईओंच्या या कारवाईमुळे आरोग्य विभागातील अनेकांना मोठा दणकाचा बसला आहे.















