Uncategorized

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना स्थगिती द्यावी, ओबीसींना निवडणुकीत न्याय देण्यासाठी पंकजाताईंची मागणी


मुंबई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना (Nagar Palika Election) स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. ओबीसी आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. आरक्षणाविना येत्या निवडणुका झाल्या, तर त्या अन्यायकारक ठरतील, अशी भूमिका पंकजाताईंनी घेतली. मुंबईत पत्रकार परिषदेत पंकजाताई बोलत होत्या.
येत्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय १८ जुलैला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ओबीसी समाजाचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष होतं. जाहीर झालेल्या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे, मात्र मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना माझी विनंती आहे, की त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तात्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी पंकजाताईंनी यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!