बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांचा समावेश आहे. या सर्व नगर पालिकांसाठी येत्या 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी निकाल घोषीत होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्वाची मागणी केली आहे. ‘काही ठिकाणी नगरपालिका निवडणूका जाहीर झाल्या आहेत, नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देवूनच निवडणूका होतील अशी खंबीर पावलं उचलावी.. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास असल्याचे त्यांनी आपल्या पोष्टमध्ये म्हटले आहे.