मुंबई, दि. 29 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली. लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे माध्यमांनी आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. ठाकरे यांनी आपला राजीनामा मंत्री अनिल परब यांच्या हस्ते राज्यपाल यांच्याकडे पाठवला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी विधान परिषदेच्या आमदारकीवरही पाणी सोडले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन आपल्याच मुख्यमंत्री विरोधात शड्डू ठोकला नंतर गेल्या दोन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री काही बोलणार का याकडे जनतेचे लक्ष लागले होते जेव्हा शिंदे परत येत नाहीत असं लक्षात आलं त्यानंतर शिवसेनेने शिंदें सोबत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे प्रयत्न करून पाहिले मात्र त्यातूनही फार काही हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर पाच वाजता बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावऱ आपल्याकडील मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.