अंमळनेर ( लोकाशा न्युज ) अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या भाटेवाडी येथील तलावात बुडवून धोंडराई ता.गेवराई येथील मुकादम बबन नारायण सुतार वय 55 वर्षे यांचा खुन करण्यात आल्याची फिर्याद मयताची पत्नी उषा बबन सुतार वय 50 वर्षे रा.धोंडराई ता.गेवराई .जि.बीड.यांनी अंमळनेर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा सोनाजी सिताराम पाचे रा.धोंडराई.ता.गेवराई व अतुल बबन शिंदे रा.आडगाव.ता.जि.बीड.यांच्या वर खुनाचा व ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यास उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांना यश आले आहे.
धोंडराई ता.गेवराई येथील उस तोडणी मुकादम बबन नारायण सुतार यांच्या ट्रॅक्टर वर बबन शिंदे रा.आडगाव पौळाच हा ट्रॅक्टर चालक म्हणून कामकाज करत होता त्याकडे मुकादम बबन नारायण सुतार यांचे पन्नास हजार रुपये होते तर सोनाजी सिताराम पाचे रा.धोंडराई .ता.गेवराई यांच्या कडे उस तोडणीसाठी दिलेले एक लाख रुपये होते पाचे हा पैसे घेऊन देखील उस तोडणीसाठी बबन सुतार यांच्या कडे गेला नव्हता यामुळे पाचे व मुकादम बबन सुतार यांच्यात नेहमी खटके उडत होते.
13 जुन सोमवार रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धोंडराईत अतुल बबन शिंदे.रा.आडगाव व सोनाजी सिताराम पाचे रा.धोंडराई हे दुचाकी घेऊन धोंडराई येथील मुकादम बबन नारायण सुतार यांच्या घरी आले व आपल्याला दारु सोडण्यासाठी वरझडी या.पाटोदा. येथे जायचे आहे असे बोलून बबन सुतार यास दुचाकीवर घेऊन आले होते .
अंमळनेर पोलिस ठाणे हद्दीतील डोंगरकिंन्ही जवळ तेरा जुन रोजी भाटेवाडी तलावाच्या जवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बबन सुतार,सोनाजी पाचे, अतुल शिंदे हे आले असता अतुल बबन शिंदे रा.आडगाव.ता.जि.बीड.व सोनाजी सिताराम पाचे रा.धोंडराई.
ता.गेवराई.जि.बीड. या दोघांनी दिड लाख रुपये बुडवण्यासाठी बबन नारायण सुतार रा.धोंडराई.ता.गेवराई. या मुकादमाचा पाण्यात बुडवून खुन केला असल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने अंमळनेर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा दिल्यामुळे पाण्यात पडून मुकादमाचा मृत्यू झाला असल्याचा खोटा खटाटोप करणाऱ्या शिंदे व पाचे यांचे पितळ उघडे पडले असुन या प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यास यश देखील अंमळनेर पोलिसांना आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अंमळनेर पोलिस ठाण्याचे .स.पो.नी.पालवे व कर्तव्य दक्ष पोलिस कर्मचारी संतोष काकडे यांच्या सह पोलीस कर्मचारी शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती
—-चौकट
उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी अत्यंत कौशल्य पुर्वक तपास करुन यातील आरोपींना चोवीस तासांच्या आत गजाआड केले असुन या प्रकरणाचा पुढील तपास हा डिवायएसपी अभिजित धाराशिवकर हे करत आहेत.
—–चौकट
भाटेवाडी हा तलाव डोंगरकिंन्ही जवळ येत असुन डोंगरकिंन्हीचे बीट जमादार संतोष काकडे हे पोलिस खात्यात अनुभवी पोलिस कर्मचारी म्हणून परिचीत आहेत घटनास्थळी जेंव्हा संतोष काकडे यांनी भेट दिली तेंव्हा देखील शिंदे व पाचे हे काहीतरी लपवत असल्याचे देखील संतोष काकडे यांच्या निदर्शनातुन सुटले नव्हते यामुळे घटना घडल्यानंतर वरील आरोपींना पोलिसांनी बसवून ठेवले होते .
—–चौकट
मयत बबन सुतार यास पोहता येत होते तरी देखील मयताच्या पत्नीला पाचे याने फोन करुन सांगितले कि बबन हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला आहे तो पाण्यातुन परत वर आलाच नाही तुम्ही ताबडतोब गारमाथा मार्गे भाटेवाडी तलावावर या . यामुळे पोलिसांना आणखी शंका निर्माण झाली अन् या प्रकरणाचे सगळे सत्य समोर आले.