Uncategorized

पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर सलग तीन वर्षे बलात्कार, मोह्यातील घटना,आरोपी अटक

सिरसाळा न्यूज : तुझ्या पतीला अपहरण करुन जिवे मारुन टाकीन असे धमकावत एका २५ वर्षीय विवाहित महिलेवर सतत ३ वर्षे बलात्कार केल्याची घटना मोहा येथे घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यातील नराधम व पिडित महिला हे ऊसतोड मजुर आहेत, ऊसतोडी दरम्यान पिडित महिलेवर सदरच्या नराधमाची वाईट नजर पडली, एका दिवशी संबंधित महिलेला गाठत नराधम पिडित महिलेला म्हणाला कि, तुझ्या नव-याचे अपहरण करुन त्यास जिवे मारुन टाकीन अशी धमकी देत तेंव्हा पासून ते आजतागायत ३ वर्षे सतत बलात्कार केला असल्याची तक्रार पिडित महिलेने पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. तक्रारी वरुन नराधम आरोपी विरुद्ध कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!