Uncategorized

बीड जिल्ह्यातील 130 यात्रेकरूंच्या मदतीला खा. प्रीतमताई धावल्या, पाच दिवस उत्तराखंडमध्ये अडकून पडलेल्या यात्रेकरूंना तात्काळ उपलब्ध करून दिली मदत


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मदतीला खा. प्रीतमताई ह्या धावून जातात, हे मागच्या आठ वर्षांमध्ये सर्वांनी पाहिलेले आहे. अशातच जिल्ह्यातील 130 यात्रेकरूंच्या मदतीलाही त्या धावून गेल्या आहेत. हे 130 जण सलग पाच दिवस उत्तराखंड याठिकाणी अडकून पडले होते, खा. प्रीतमताईंच्या एका फोनमुळे या यात्रेकरूंना तात्काळ मदत मिळाली आहे. या मदतीबद्दलच आता खा. प्रीतमताईंचे यात्रेकरूंकडून आभार मानले जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण परिषदेचे विजय घुमरे यांच्यासह बीड जिल्ह्यातील 130 जण बालाजी यात्रा कंपनीद्वारे दोन धाम करण्यासाठी उत्तराखंड मध्ये गेलेले आहेत. पण अतिशय बिकट परिस्थितीमुळे व अतिशय गर्दीमुळे ते सर्वजण सलग पाच दिवस ऋषिकेश (उत्तराखंड) येथे अडकून पडलो होतो. पुढे जाण्यासाठी उत्तराखंडची गाडी मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही अडकलो होतो एवढ्यात काही पर्याय सापडतो का? म्हणून घुमरे यांनी खा. प्रीतमताईंना फोन केला. त्यानंतर खा. प्रीतमताईंनी तेथील खासदार आणि पर्यटन मंत्र्यांना संपर्क करून बीडच्या यात्रेकरूंना तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. यात्रेकरूंसाठी त्या मदतीला धावून आल्यामुळे त्यांचा प्रश्न सुटला. याबद्दल ताईंचे यात्रेकरूंनी आभार मानले आहेत. ‘आपले सहकार्य सर्व यात्रेकरू कधीच विसरू शकत नाहीत, आपल्या सहकार्याबद्दल आम्ही खूप ऋणी आहोत. त्याकरिता सर्व यात्री आपले आभारी आहोत. ताई अशीच जनसेवा आपल्या हातून घडण्यासाठी आपणास उदंड आयुष्य लाभो व आपणास उदंड शक्ती मिळो, आपले भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच सर्व यात्रेकरू तर्फे ईश्वराकडे प्रार्थना.. सर्व यात्रेकरूंना आपल्या भेटीची आस लागली असून भेट झाल्यास दुग्धशर्करा योग, असे विजय घुमरे यांनी आपल्या पोष्टमध्ये म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!