Uncategorized

वाळू स्वस्त होणार, जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला वाळू ठेकेदारांनी दर्शविली संमती, शर्मांनी ठोस उपाययोजना आखल्यामुळे आ. लक्ष्मण पवारांनी उषोषण घेतले मागे, नोडल अधिकारी म्हणून ठोंबरे, कुमावतांची केली नियुक्ती


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : वाळूघाट खुले झाल्यानंतरही जिल्ह्यातील वाळू स्वस्त झाली नसल्याचे माध्यमांनी समोर आणले होेते. दुसरीकडे आ.लक्ष्मण पवार यांनी वाळूतील माफियागिरीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले आणि वाळूच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच वाळू स्वस्त करण्यासाठी बीड प्रशासनाने पुढाकार घेतला. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील वाळू कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांना वाळूच्या किंमती कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर ठेकेदारांनीही किंमती कमी करण्यास संमती दर्शविली आहे, तसेच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबर आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती केली आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही बैठक घेवून जिल्हाधिकार्‍यांनी ठोस भुमिका आखल्यामुळे आ. लक्ष्मण पवारांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
आ. लक्ष्मण पवार, गेवराई मतदार संघ यांनी गेवराई विधानसभा मतदार संघात सुरु केलेल्या वाळु घाटावर प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन होत असल्याबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गौण खनिज विषयक होणार्‍या उत्खननाबाबत दि.24 मे रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार , सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, तहसिलदार गेवराई , तहसिलदार सुहास हजारे बीड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, गेवराई, पोलीस निरीक्षक गेवराई, चकलांबा इ. अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमधील सर्व महसूल व पोलीस अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांनी वाळू संदर्भात कडक निर्देश दिले आहेत. वाळू वाहतुक करताना ज्या हायवा किंवा वाळु वाहतुकीची मोठी वाहने वाळु वाहतुक करत आहेत, त्या गाडींचे क्रमांक स्पष्ट दिसुन येत नाहीत त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी ज्या गाड्यांवर क्रमांक नाहीत अशा गाड्यांवर कार्यवाही करावी, विनानंबर हायवा दिसुन आल्यास त्यांना मागील व पुढील दर्शनी भागामध्ये नंबर लावण्यात यावे, अवैध वाळु वाहतुक रोखण्याकरिता पोलीस विभाग तसेच महसुल विभागाचे संयुक्त पथक राक्षसभुवन, मादळमोही रोड, गुंतेगाव फाटा, महाटाकळी फाटा, जातेगाव फाटा, शिवाजी चौक तलवाडा व राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 पाडळसिंगी टोलनाका या ठिकाणी चेकनाक्यांवर कार्यान्वित करण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील अवैध वाळु वाहतुकीबाबत संयुक्त पथकासोबतच फ्लाईंग स्कॉड ( तहसिलदार व पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील नियुक्त करण्यात येत आहे. श्री पंकज कुमावत सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग केज हे पोलीस कर्मचारी साठी नोडल अधिकारी म्हणुन काम पाहतील. तसेच महसूल कर्मचारी पथक साठी श्री . तुषार ठोंबरे अपर जिल्हाधिकारी, बीड हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व तहसिलदार जि. बीड यांना दि .20.05.2022 रोजी शासन पत्रान्वये कळविण्यात आल्यानुसार गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांना माहे 31 मे 2022 पर्यंत जीपीएस बसविण्याची कार्यवाही संबंधित वाहनधारकांना / लिलावधारकांना करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच दि .01.06.2022 नंतर गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांवर जीपीएस डिव्हाईस नसलेले निदर्शनास आल्यास महाखनिज प्रणालीद्वारे वाहतुक करणार्‍या वाहनांना ईटीपी इश्यु करण्यात येणार नाही तसेच ईटीपी क्र . शिवाय करण्यात येणारी वाहतुक व त्याद्वारे केलेली वाहतुक अवैध समजण्यात येईल. जिल्हाधिकारी यांनी उक्तप्रमाणे नियुक्त केलेल्या पथकांद्वारे तात्काळ कार्यवाही करुन अवैध वाळु वाहतुकीवर आळा घालण्यात येईल तसेच सदर वाळु वाहतुकीचे दर कमी करण्याच्या अनुषंगाने संबंधित लिलावा धारक यांची दि . 24.5.2022 रोजी 6.00 वाजता यांचे सोबत बैठक घेवून वाळू दर प्रती ब्रास कमि करणे बाबत आव्हान केले असता सर्व लिलावधारक ता . गेवराई यांनी वाळू दर कमी करणे बाबत सहमती दर्शविलेली आहे. तसेच दिनांक 31.05.2022 पर्यंत सर्व गौण खनिज वाहतुक करणार्‍या वाहनांना ॠझड प्रणाली बसवुनच गौण खनिज वाहतुक करणे बाबत सर्व लिलावधारक यांना सुचीत केले आहे. अन्यथा दि. 01.06.2022 नंतर बिना ॠझड केलेली वाहतुक ही अवैध समजुन दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल या बाबत सुचीत केलेले आहे. वरील प्रमाणे करण्यात केलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत मा . आ . श्री . लक्ष्मण पवार , गेवराई मतदार संघ यांना अवगत करून उपोषणापासुन परावृत्त होण्यास विनंती केली. त्याअनुषंगाने मा.आ.श्री . लक्ष्मण पवार , गेवराई मतदार संघ यांनी दि. 24 मे रोजी सायं 8.15 वाजता उपोषण मागे घेतले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!