Uncategorized

भरधाव वाहनाच्या धडकेत शिक्षक ठार, धारूर केज रस्त्यावरील घटना


किल्लेधारूर (वार्ताहर ) धारूर केज रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग वर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान एका भरधाव वाहनाने एका पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड वय 40 वर्ष यांना उडवल्याने ते या अपघातात जागीच ठार झाले मात्र हे वाहण पसार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी सायंकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली,
धारूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग वर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान रविवारी 22 मे रोजी रात्री साडे आठ च्या दरम्यान रस्त्याने पायी चालणारे पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड हे चालत असताना एका भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना उडवल्याने ते जागेवर गंभीर जखमी झाले व या अपघातात ते जागीच ठार झाले संबंधित धडक देऊन जाणारे वाहन हे पसार झाले असून पोलीस या वाहनाचा शोध घेत आहेत. गणेश मिठेवाड यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्यावर ते जागीच ठार झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले मिठेवाड हे जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!