बीड/प्रतिनिधी
बीड नगरपरिषदेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत बीड शहरातील नवीन 15 सिमेंट रस्ता कामासाठी 69.85 कोटी रु.मंजुर झाले असुन याच्या प्रशासकीय मान्यतेचे पञ आज मंञालयात नगरविकास विभागाचे अवर सचिव यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्याकडे सोपविले असून लवकरच राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे
गेल्या अनेक दिवसांपासुन माजी मंञी जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या माध्यमातून यासाठी सातत्याने नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर,युवा नेते डॉ.योगेश (भैय्या) क्षीरसागर हे पाठपुरावा करत होते.त्याला यश मिळाले आहे. दोन दिवसापूर्वीच प्रशासकीय मान्यतेच्या आदेशाची पूर्तता करण्यात आली असून येत्या काही दिवसातच राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बीड मधील नव्याने होणाऱ्या पंधरा रस्त्याचे उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे यामुळे बीड शहराचा चेहरामोहरा बदलणार असून पहिल्या टप्प्यात झालेल्या सोहळा आणि आता होणाऱ्या 15 रस्त्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे वीन होणार्या रस्त्यालगत मोठी बाजारपेठ निर्माण होऊन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे तर या रस्त्यालगत असलेल्या जमिनींचा भाव देखील वाढणार आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे