Uncategorized

डॉ. जाजूंच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीत मातासह बालकाचा मृत्यू, जाजू दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी, मृतदेह चार तास रूग्णालयाच्या दारात आणून संतप्त नातेवाईकांचा टाहो


माजलगाव, दि. 16 (लोकाशा न्यूज) : येथील शिवाजीनगर भागात असलेल्या डॉ. जाजु दाम्पत्याच्या असलेल्या जाजु हॉस्पिटल या ठिकाणी एका गरोदर मातेचा बाळासह मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दि. 16 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. डॉक्टरांनी रूग्ण गंभीर असल्याची वेळीच कल्पना न दिल्यामुळे माता बालकाचा जीव गेला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत एकच टाहो फोडला, तसेच डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास इन्कार केल्यामुळे सुमारे चार तास मृतदेह दवाखान्यात होता त्यामुळे ठिकाणी चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
खेर्डा (ता. माजलगांव) येथील सोनाली पवन गायकवाड ही 22 वर्षीय महिला रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान प्रसुतकळा येत असल्याने प्रसुतीसाठी दाखल झाली होती. मागील 9 महिन्यांपासुन याच ठिकाणी तीची ट्रिटमेंट चालु होती. पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान सदर महिलेची परिस्थिती गंभिर झाली असता औरंगाबाद या ठिकाणी जाण्यासाठी रेफर करण्यात आले परंतु पुढील तयारी करेपर्यंतच महिलेचा मृत्यु झाला. येथील डॉ. उर्मिला जाजु यांनी योग्यवेळी आम्हाला पेशंट बाबत कल्पना दिली नाही त्यामुळेच महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करीत नातेवाईक चांगलेच संतप्त झाले त्यामुळे हॉस्पिटल परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी पोलीसांना पाचारण करण्यात आले तरी देखील जमाव ऐकण्याच्या स्थितीतीत नव्हता. नातेवाईकांनी महिलेचा व पुरुष जातीच्या बाळाचा मृतदेह दवाखान्यातच ठेवुन जोपर्यंत डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हालवु देणार नाहीत अशी भुमिका घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, ए.पी.आय. केंद्रे व शहरातील प्रतिष्ठीत नागरीक पत्रकारांनी संतप्त जमावाला शांत करत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसांत जाण्याचे सांगीतले. नंतर हा जमाव गुन्हा दाखल करण्यासाठी माजलगांव शहर पोलीसांत गेला त्या ठिकाणी त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली व तांत्रीक बाबींचा तपास करुन तसेच शवविच्छेदन अहवालावरुन योग्य तो गुन्हा दाखल करण्याची हमी देण्यात आल्यानंतर जमाव शांत झाला. यानंतर महिला व बालक यांचे मृतदेह अंबाजोगाई या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. मयत सोनाली गायकवाड हिची ही पहिलीची प्रसुती होती त्यात तिचा आणि बाळाचा मृत्यु झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतांना दिसुन येत होती. दरम्यान जाजु हॉस्पिटल या ठिकाणी ही तिसरी चैथी घटना असल्यामुळे सदर डॉक्टर दामपत्याचा परवानाच रदद करण्यात यावा अशी देखील मागणी समोर येत आहे. ‘आम्हाला वेळीच कल्पना दिली असती तर आज दोन जीव वाचले असते, असे नातेवाईकांनी म्हटले आहे. सोनाली हिची मागील 9 महिन्यांपासुन याच डॉक्टरकडे ट्रिटमेंट सुरु होती, त्यामुळे त्यांना पेशंटची सर्व कल्पना होती. सोनालीला रविवारी संध्याकाळी 7 वाजताच आम्ही प्रसुतीसाठी दाखल केले होते. रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान पेशंटला झटका आला या बाबत कल्पना दिल्यानंतर डॉक्टरांनी वेळीच आम्हाला रेफर केले असते तर दोन जीव वाचले असते, डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच माता व बालकाचा मृत्यु झाला असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. जाजू हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. उर्मिला जाजू यांनीही आपली भुमिका स्पष्ट केली आहे. सदरील पेशंटवर मी गेल्या 9 महिन्यांपासुन योग्य उपचार केलेले आहेत. प्रसुतीसाठी आल्यानंतर परिस्थिती व्यवस्थित होती तसेच बाळाची तब्येत नाजुक असल्याबाबतचीही कल्पना दिली आणि सदर महिलेची डिलेव्हरी देखील नातेवाईकांच्या संपुर्ण संम्मतीने नॉर्मल केली. रात्रभर मी माझया केबीनमध्येच होते व वेळोवेळी लक्षही ठेवून होते परंतु सदर पेशंटला झटका आल्यानंतर त्यासंदर्भातील उपचार देखील वेळीच केले परंतु परिस्थिती गंभिर होत असल्याने सदर महिलेला औरंगाबाद किंवा अंबाजोगाई येथे उपचारासाठी रेफर लेटर देवून पाठवलेही होते, असे डॉ. जाजू म्हणाल्या आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!