बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : देशाचे जाणते नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट करून त्यांची हत्या करण्याबाबत भडकावू वक्तव्य करणारे निखिल भामरे, मनोज बागलानकर, केतकी चितळे,ड. नितीन भावे या विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्यासह समता सैनिकांनी केली आहे.
दि. 14 मे 2022 रोजी निखिल भामरे, मनोज बागलानकर, केतकी चितळे,अॅड. नितीन भावे या विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावरून बदनामीकारक आणि आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करून खा. पवार साहेबांवर प्रेम करणार्या राज्यातील समस्त कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या जडणघडणीमध्ये पुढाकार घेणार्या खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा अजेंडा घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशभरात पुरोगामी विचारसरणी जोपासत समाजकार्य आणि राजकारण केलेली आहे. त्यांची बदनामी करण्याबरोबरच त्यांचा खून करण्याबाबत वेळ आली आहे बारामती च्या गांधी साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायचीअसे भडकाऊ वक्तव्य या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून केली असून त्यांचा खून करण्याबाबत भडकवले आहे. निखिल भामरे याने खा.शरदचंद्र पवार साहेब यांची हत्या करणेबाबत भडकावू वक्तव्य केले असून केतकी चितळे हिने दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगलजन्य परिस्थिती निर्माण होईल असे वक्तव्य पोस्टच्या माध्यमातून केले आहे. तर या पोस्टला मनोज बागलानकर आणि अॅड. नितीन भावे यांनी क्रमशः प्रोत्साहन दिले आहे. तरी खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी सोशल मीडियावर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट करून त्यांची हत्या करण्याबाबत भडकावू वक्तव्य करणारे निखिल भामरे, मनोज बागलानकर, केतकी चितळे,ड. नितीन भावे या विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, अॅड. संदीप बेदरे, अॅड. सुशील सरपते, समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, वैभव खेत्रे, धनंजय काळे यांच्यासह समता सैनिकांनी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आज रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राठोड यांनी दिले आहे.