Uncategorized

बीड आरटीओची औरंगाबादमध्ये धडाकेबाज कारवाई,मोटार वाहन निरीक्षकालाच दिले बोगस लायसन्स, गुन्हा दाखल

बीड, शासनाने जून 20२१ पासून घरबसल्या लर्निंग लायसन नागरिकास सोय उपलब्ध करून दिली.याकरिता नागरिकांनी आरटीओ कार्यालयात भेट देण्याची कोणतीही आवश्यकता उरली नाही. सदर शासकीय योजनेचा उद्देश लोकांना कोणताही त्रास न होता घरी बसून लायसन्स मिळावे हा होता.

या योजनेचा सर्वात जास्त गैरवापर ड्रायव्हिंग स्कूल चालक,एजंट व सेतू सुविधा केंद्र चालविणाऱ्यांनी घेऊन मनमानी पद्धतीने लोकांकडून अव्वाचे सव्वा पैसे RTO च्या नावाने वसूल करत आहेत. सदरचा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात सुरू असून याबाबत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सदर बोगस पणे लर्निंग लायसन्स वाटप करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जारी केले.

यानुषंगाने अधिकारी औरंगाबाद यांनी बीड आरटीओ कार्यालयातील निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांना औरंगाबाद येथे तपासणी करता आदेशित केली असता, किरण दळवी यांच्या श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल,जळगाव रोड औरंगाबाद,येथील स्कूलवर बोगस लर्निंग लायसन्स करत असल्याचे निदर्शनास आले, याबाबत स्वतः मोटार वाहन निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांनी वेषांतर करून सदर स्कूल ला भेट दिली असता किरण दळवी यांनी अर्जदार हा शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीस प्रत्यक्षात उपस्थित आहे किंवा नाही, कागदपत्रे काय दिलीत हे काहीही न तपासता ज्या कामाची शासकीय पावती फक्त ३०० रु आहे त्याचे २००० रू घेऊन विनाउमेदवार शिकाऊ लायसन्स जारी केले.सदर बाब अत्यंत गंभीर असून मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारी आहे. अशाच पद्धतीने जर गाडी चालवणारे चालक रस्त्यावर आले तर निश्चितच अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होऊन रस्ता सुरक्षा ही केवळ एक मृगजळ ठरेल.

शासनाच्या धोरणाचा अशा पद्धतीने गैरवापर करणाऱ्या श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक किरण दळवी यांच्यावर
शासनाची फसवणूक केले बाबत श्री गणेश विघ्ने मोटर वाहन निरीक्षक,बीड यांनी सिडको शहर पोलीस स्टेशन येथे भादंवि ४२०,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!