Uncategorized

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरेंच्या भेटीनंतर नराधमाला केली तात्काळ अटक, अ‍ॅड खोसरेंची भुमिका रामपुरीतील पीडित मुलीला न्याय मिळवून देणार


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : रामपुरीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती, या घटनेची बाल हक्क आयोगाच्या सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि सदर आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश प्रत्यक्ष ठाण्यात जावून पोलिस अधीकार्‍यांना दिले. त्यावर पोलिसांनीही या घटनेतील नराधमाला तात्काळ बेड्या ठोकण्याचे काम केले आहे. दरम्यान अ‍ॅड खोसरे यांनी घेतलेली भुमिका पीडित मुलीला न्यायच मिळवून देणारी ठरणार आहे.
तलवाडा जवळील रामपुरी या गावच्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जवळच राहणार्‍या एका नराधमाने बलात्कार केला होता, या प्रकरणी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांच्या नेतृत्वाखाली बाल हक्क आयोगाची सदस्या अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. सदर प्रकरणातील आरोपीला तात्काळ करून कठोर शिक्षा व्हावी, असे आदेश खोसरे यांनी पोलिस अधिकार्‍यांना दिले. यावेळी पोलिसांनी सहकार्याची भूमिका दाखवली आणि अगदी काही वेळेतच सदर नराधमाला गजाआड केले. यावेळी अ‍ॅड खोसरे यांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन मुलीबरोबरच आणि तिच्या आई वडिलांना धीर दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!