Uncategorized

पंकजाताई मुंडेंचा मतदारसंघात सर्वस्पर्शी दौरा, जनतेचं प्रेम अन् विश्वास तसुभरही कमी नाही ; सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोगही प्रभावी!

काहीच नेते असे असतात की, ते सत्ता असो वा नसो सर्वसामान्यांना प्रिय असतात.त्यापैकी एक म्हणजे पंकजाताई मुंडे! ताईंची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही एवढंच नाही तर जनतेचे त्यांचेवर असलेले प्रेम आणि विश्वास यातही बदल झालेला नाही. पंकजाताई मुंडे नावाचं “गारूड” आजही जनतेच्या मनामनावर आहे, याची प्रचिती त्यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौऱ्यावरून आली.

पंकजाताई मुंडे यांनी नुकताच बीड, परळीचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान विविध जाती-धर्मातील कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी त्यांनी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झाल्याने ‘ताई म्हणजे आपलं नेतृत्व’ ही भावना स्पष्टपणे कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबियांमध्ये जाणवत होती.

शहरातील विविध प्रभागात तसेच काही गावांना भेटी देताना तिथल्या समस्याही ताईंनी ऐकून घेतल्या. एक हक्काचा माणूस आपले प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास असल्याने लोक नेहमीच आपले गाऱ्हाणे त्यांचेसमोर मांडत असतात म्हणूनच परळी शहर असो की सुगांव, सायगांव, बर्दापूर,नांदगाव आदी गावांतील नागरिकांनी आपल्या अडीअडचणीही त्यांचेसमोर दौऱ्यात मांडल्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा, जनतेचे प्रश्न सोडविण्यात त्यांना आलेले अपयश लोक ठिकठिकाणी उघडपणे बोलून दाखवत होते. ताईंच्या आणि आताच्या मंत्र्यांच्या कामाची तुलना करतांना ताईच्या मंत्रीपदाचा काळ कसा चांगला होता हे आता लोकांना उमजू लागले आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने व जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकरी,कष्टक-यांच्या घामाला न्याय दिला नसल्याची खंत ऐकायला मिळाली. पंकजाताई सत्तेत असताना विकासनिधीची कमतरता नव्हती.विकास काय असतो हे ताईंनी दाखवून दिले असून त्या सत्तेत नसल्या तरी आमचं भलं करण्याची इच्छाशक्ती फक्त त्यांच्यातच असल्याची भावना लोकांमध्ये आहे.

या दौऱ्यात शक्तीप्रमुख,बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन ताईंनी त्यांच्याशी थेट वन टू वन संवाद साधताना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.संघटनात्मक कार्याचा आढावाही त्यांनी घेतला.

मुंडे साहेबांसारख सोशल इंजिनिअरिंग

लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब हे सर्व जाती-धर्मांना,समाजातील छोट्या-मोठ्या वर्गाला सोबत घेऊन निवडणूकांना सामोरे जात.परंतू त्या निवडणूकांआधी त्यांच्या वागण्यातून तशी जमीन तयार व्हायची.अगदी तसेच हुबेहुब या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंकजाताईंनी जिल्ह्यातील विविध जातीधर्माच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवली, त्यांच्या परिवारासमवेत वेळ घालवला, मनमोकळा संवाद केला. गेवराई, बीड,परळी येथे मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराला ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी महिला व तरुणांचा उत्साह पहावयास मिळत होता.भविष्यात सर्व मुस्लीम बांधव पंकजाताईंच्या पाठीशी ठामपणे उभे असतील असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

एकूणच या दौऱ्यात ताईंनी समाजातील सर्व घटकांना स्पर्श केल्याचे दिसून आले. जनतेचं त्यांचेवर असलेलं प्रेम आणि विश्वास यावेळी ठळकपणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. सर्वसामान्यांच्या काळजात ‘आपला नेता’ म्हणून मिळणारं हे प्रेम ताईंचं नेतृत्व भविष्यातही अधिक ताकदवान आणि बळकट करणारं आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!