बीड: शहरातील प्रभाग क्रमांक ११ येथील आय.टी.आय.ग्राउंड वरील असलेल्या वॉकींग ट्रॅकचे,आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.९) रोजी सकाळी फलकाचे अनावरण करत लोकार्पण केले.यावेळी नागरिकांना सोयीसुविधांसोबत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
बीड शहरातील आय.टी.आय. ग्राउंड वर सकाळी व सायंकाळी महीला,पुरुष तसेच विद्यार्थी वॉकींग व व्यायामासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात.येणार्या नागरिकांना व्यायाम व वॉकींग साठी सोयीचे व्हावे याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठपुरावा करत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जुना मातीचा ट्रॅक काढून व्यवस्थित व सुशोभित असलेला वॉकींग ट्रॅक तयार केला.यामुळे आता येथे व्यायामासाठी येणार्या नागरिकांना या ट्रॅकच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.नागरीकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते आणि व्यायाम करण्यासाठी नागरिकांना सोयीसुविधा व योग्य ठिकाणे आम्ही तयार करणार आहोत.यामाध्यमातून आम्ही नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे याकरिता सदैव प्रयत्नशील आहोत असे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.या लोकार्पण कार्यक्रमास आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सुनील धांडे, माजी आ.सय्यद सलीम व प्रभागातील तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.
चौकट
भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच व्यवस्था
बीड शहरात ग्रामीण भागातून पोलीस,सैन्य यासह विविध भरत्यांची तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येत असतात.हे विद्यार्थी मैदानी सरावासाठी मोठ्या संख्येने आय.टी.आय. ग्राउंडवर दररोज येतात.मात्र याठिकाणी महिलांची वॉकींगसाठी गर्दी असते.त्यामुळे भरतीची तयारी करण्यार्या विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रकारची सोय लवकरच करण्यात येईल असे आश्वासन आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिले.