Uncategorized

खा. प्रीतमताईंच्या रस्ता पाहणीची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल, अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात सुचना फलक बसविले, लवकरच गतिरोधकही बसणार


बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : खा. प्रीतमताई मुंडे यांनी केलेल्या रस्ता पाहणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. कारण अंबाजोगाई लातूर महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सुचना फलक बसविण्यात आले आहेत. तर लवकरच गतिरोधकही बसणार आहेत.
मागच्या तीन दिवसांपुर्वी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राची संबंधित अधिकार्‍यांसमक्ष खा. प्रीतमताई मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना तेंव्हा सर्व संबंधितांना त्यांनी दिल्या होत्या. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. अपघात प्रवण क्षेत्रात सूचना फलक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे, तसेच गतिरोधक बसवण्याचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. चौपदरीकरण आणि दुभाजक बसवण्याचा पाठपुरावा देखील त्या सातत्याने करत आहेत. परिणामी जीव मौल्यवान आहे, त्यामुळे प्रत्येकाने प्रवास सावकाश आणि काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना आणि वाहनधारकांना खा. मुंडेंनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!