Uncategorized

वाहन कर भरणा केलेल्या बनावट पावत्या सादर करणे अंगलट आले ! आरटीओ कार्यालयातील एका मोठ्या एजंटाच्या बोगसगिरीचा पर्दाफाश, एजंट नदीमवर 420 चा गुन्हा दाखल



बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : वाहन कर भरणा केलेल्या बनावट पावत्या सादर करणे बीडच्या आरटीओ कार्यालयातील एका मोठ्या एजंटाला चांगलेच अंगलट आले आहे. कारण त्यांच्याजवळ काम करणार्‍या नदीम नावाच्या एजंटावर आरटीओंनी बीड ग्रामीण ठाण्यात थेट 420 चा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामुळे आरटीओ एजंटांची पुन्हा एखदा थु थू होत आहे.
याबाबत येथील आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुरेखा कचरु डेडवाल यांनी बीड ग्रामीण ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. े6 मे रोजी मी माझ्या कार्यालयात कर्तव्यावर हजर असतांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या दालनात मला बोलावले व एम.एच.43 डी. 9535 (प्रो.एस.जे.टुर्स अ‍ॅण्ड टॅव्हल्स), एम.एच.43 बी.जी. 7089 (प्रो.एस.जे.टुर्स अ‍ॅण्ड टॅव्हल्स) या वाहनांचे वाहन कर संगणकावर ऑनलाईन करुन देण्यासाठी दाखल केलेले अर्ज व सोबत जोडलेल्या मोटार वाहन कर पावत्या सदर पावत्यांचे संगणकीय ऑनलाईन सत्यता पडताळणी करण्याचे आदेश केले. त्यानुसार सदर मोटार वाहन पावत्यांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे  निर्दशनास आले. सदरचे अर्ज एजंट नदीम याने माझ्याकडे सादर केले होते. सदर अर्जासोबत जोडलेल्या मोटार वाहन कर भरणा केलेल्या पावत्या खर्‍या समजून मोटार वाहन कर संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करण्याकरीता माझ्या लॉगीन आयडीवरुन 20 एप्रिल 2022 रोजी इंट्री व व्हेरिफाय केले होते. त्यानंतर सदरचे अर्ज अप्रोल करण्याकरीता उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांची अंतिम मान्यता आवश्यक होती. त्या अनुषंगाने अंगद टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स व एस.जे.टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने एजंट नदीम याने सदरचे अर्ज परस्पर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडे सादर केले. नदीम यांनी सदरच्या बनावट मोटार वाहन कर भरणा केलेल्या पावत्या बनावट असल्याचे माहिती असतांनाही त्या खर्‍या असल्याचे भासून शासनाची फसवणूक केले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार माझी कार्यालयाची व पर्यायाने शासनाची फसवणूक केली असे सुरेखा डेडवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानूसार बीड ग्रामिण ठाण्यात नदीम नावाच्या एजंटवर कलम 420, 461, 468, 471, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!