Uncategorized

परळीत संभाजीनगर पोलिसांनी गुटखा विक्रीचा केला पर्दाफाश ;
केजच्या एका व्यापाऱ्यासह तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ दि ‌६ ( लोकाशा न्युज ) :- परळीत संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी शहरात विक्री होत असलेल्या गुटख्याचा पर्दाफाश केला असून केजच्या गुटखा पुरवठा करणाऱ्या एका व्यापाऱ्यांसह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने शहरात गुटखा विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेली अनेक वर्षांपासून राज्यात गुटखाबंदी आहे. असे असतांना सर्रास बेकायदेशीररित्या गुटखा विक्री होत असल्याच्या ठिकाणी जिल्हाभर गेल्या अनेक दिवसांपासून पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. अशाच प्रकारे शहरातील जमजम कॉलनी भागात एका ठिकाणी सर्रास गुटखा विक्री होत असल्याचा सुगावा संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना लागला. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री परळीतील जमजम कॉलनीतील गुटखा विक्री होत असल्याच्या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी‌ पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, डीबी शाखेचे सचिन सानप, व्यंकट भताने, रवीकुमार पवार, शत्रुघ्न शिंदे आदींना मोहिमेवर पाठवले या पथकाने अत्यंत शिताफीने फिरोज शेख याच्या जमजम कॉलनीतील घरावर अचानक धाड टाकून गुटख्यावर मोठी धडाकेबाज कारवाई‌ केली. सदर ठिकाणी हाकीम हैदर कुरेशी हा आपले स्वत:चे कब्जात १ लाख ३५ हजार रु किंमतीचा राजनिवास
गुटखा, व सुगंधी तंबाखु, आर. एम. डी. पान मसाला तसेच जाफरानी जर्दा, इ. चा चोरटी विक्री करणेसाठी बाळगलेला मिळुन आला. हा गुटखा कोणाकडुन आनला असे विचारले असता त्यांनी पप्पु कदम रा. केज याचेकडुन आनला आहे असे सांगीतल्याने पोलीस निरीक्षक सुरेश काटे यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी हाकिम हैदर कुरेशी वय ४७ वर्षे रा. जुना रेल्वे स्टेशन परळी, केजचा गुटका पुरवठा करणारा व्यापारी पप्पु कदम, फेरोज शेख रा. जमजम कॉलनी परळी यांचे विरुध्द गुरन ९०/२०२२ कलम ३२८, २७२, २७३ भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चांद मेंढके करीत आहेत.
दरम्यान संभाजीनगर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने शहरातील गुटखा विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईमुळे संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके, डीबी शाखेचे सचिन सानप, व्यंकट भताने, रवीकुमार पवार, शत्रुघ्न शिंदे आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!