Uncategorized

सौर ऊर्जा पंप चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून फिल्मीस्टाईल पाठलाग,दहा किलोमीटर पाठलाग करुन चोरटे पकडण्यात गेवराई पोलिसांना यश

गेवराई : लोकाशा न्युज
सौर ऊर्जा चोरी करणारी टोळी गेवराई पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करून पकडली. चोरीचे साहित्य ट्रॅक्टरमध्ये घेऊन जातांना तब्बल दहा किलोमीटर नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून चोरटे पकडण्यात गेवराई पोलिसांना यश आले आहे.

शेतकऱ्यांच्या विहिरीवर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा पंपाच्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तालुक्यातील विविध ठिकाणचे सौर ऊर्जा पंपाच्या चोरीचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यापासून पोलीस चोरट्यांचा तपास करत असतांना शुक्रवार दि.06 मे रोजी मध्यरात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गेवराईच्या बाह्यवळणावर गेवराई ठाण्याचे पोलीस विठ्ठल देशमुख यांना एक संशयीत सौर ऊर्जाचे साहित्य घेवून जाणारे ट्रॅक्टर आढळून आल्यानंतर त्यानी ट्रॅक्टरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.यावेळी ट्रॅक्टर सुसाट वेगाने कच्च्या रस्त्याने खांडवी तांड्याकडे निघाले असतांना पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पध्दतीने पाठलाग केला.खांडवी तांडा,रानमळा या शिवारातून सदरील ट्रॅक्टर अर्धामसाला शिवार आल्यानंतर पोलीस पाठलाग करायचा सोडत नसल्याने चोरट्याने ट्रॅक्टर सोडून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅक्टरसह चोरीचे साहित्य ताब्यात घेतले असून याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील कारवाई डीबी पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे, पोलीस विठ्ठल देशमुख, नवनाथ गोरे, भुतेकर यांनी केली.गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!