बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : आज संपूर्ण देशभरासह बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. याअनुषंगाने बीड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यात 2474 पोलिस कर्मचार्यांचा तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सर्वांनी शांतता ठेवावी, शांतता भंग करणार्या समाजकंटकांना जशाच तसे उत्तर देण्याची आम्ही तयारी केली असल्याचे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी दै. लोकाशाशी बोलताना म्हटले आहे.
सध्या मस्जिदीवरील भोंग्यांवरून राज्यासह बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर आम्ही चार मेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा ईशारा तर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेला आहे. याच अनुषंगाने आज साजरी होणार्या रमजान ईददरम्यान बीड जिल्ह्यात शांतता आबाधीत रहावी, याकरिता पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये स्वत: ते, दोन अप्पर पोलिस अधीक्षक, पाच डीवायएसपी, 22 पोलिस निरीक्षक, 55 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 74 पोलिस उपनिरीक्षक, 1365 पोलिस कर्मचारी, आरसीपी जवान शंभर, एसआरपी जवान 200 आणि होमगार्ड 650 असा एकूण 2474 कर्मचार्यांचा यामध्ये समावेश आहे. बीड जिल्हा पोलिसांची दिवसभर करडी नजर असणार असून यासंदर्भात स्वत: पोलिस अधीक्षकांनी बीड जिल्हावासियांना अहवान केले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता ठेवावी, शांततेला कोणीही नख लावण्याचा प्रयत्न करू नये, समाज कंटकांना जशाच तसे उत्तर देण्याची आम्ही तयारी केली असल्याचे देशमुख यांनी दै. लोकाशाशी बोलताना म्हटले.
दोन्ही अॅडीशनल एसपींसह
इतर अधिकारी सक्षम
बीड जिल्ह्यात शांतता आबाधीत ठेवण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, कविता नेरकर यांच्यासह जिल्हा पोलिस दलातील इतर अधिकारी आणि कर्मचारी सक्षम असल्याचे स्वत: पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे बीडमधील शांतता आबाधीत राहील, असा विश्वासही यावेळी देशमुख यांनी बोलून दाखविला आहे.
3 मेची साप्ताहिक सुट्टी रद्द
ईदच्या पार्श्वभुमिवर पोलिस दलातील सर्व पोलिस अधीकारी आणि कर्मचार्यांच्या सर्व सुट्टट्या (फक्त वैद्यकिय वगळून) रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आज बीड जिल्ह्यातील एकाही पोलिस अधीकारी किंवा कर्मचार्याला साप्ताहिक सुट्टी घेता येणार नाही.