माजलगाव/मजरथ, दि. 2 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील मंजरथ येथे उसने दिलेले 5 लाख रुपये परत का मागितले. या कारणाने चिडून जाऊन पती-पत्नीने पैसे उसने देणार्या 65 वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने भररस्त्यात वार करून खून केला. ही घटना रविवार रोजी सात वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील मंजरथ येथे घडली.
चार वर्षांपूर्वी शेती घेण्यासाठी पती-पत्नी दांपत्य राजाभाऊ सर्जेराव गायकवाड व दैवशाला राजाभाऊ गायकवाड (रा.मंजरथ) यांना त्यांचे मित्र याच गावातील मारुती चुरामन घटे (वय 65)यांनी 5 लाख रुपये दिले होते. या व्यवहारा वरून रविवार रोजी संध्याकाळी 7 वाजता मंजरथ येथील बस स्थानकावर उभयतांमध्ये वाद सुरू होता.दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून गायकवाड पती-पत्नीने मारुती घटे या 65 वर्षीय वृद्दास खूप पैसेवाला झालास का असे म्हणत दैवशाला गायकवाड यांनी मारुती घटे यांचा हात धरला.तर राजाभाऊ गायकवाड यांने हातात असणार्या सुरीने मारुती घटे यांच्या छातीत,डोक्यात, खांद्यावर व ईतर काही ठीकाणी जोर जोरात वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांना ठार मारले. भर रस्त्यात झालेल्या या थरारक प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले.दरम्यान मयताचा मुलगा राजा मारुती घटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजाभाऊ सर्जेराव गायकवाड , दैवशाला राजाभाऊ गायकवाड यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठान्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असुन या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजयसिह जोनवल,पो.उपनि सचिन दाभाडे हे करत आहेत.