Uncategorized

शैलेश राजनाळे खून प्रकरणातील आरोपी एका तासातच गजाआड ;शहर पोलिस ठाण्याचे डीबी प्रमुख भास्कर केंद्रे यांची कामगिरी

परळी वैजनाथ दि २ ( लोकाशा न्युज ‌) :- दोन दिवसांपूर्वी परळी शहरातील नांदूरवेस भागात तिक्ष्ण हत्याराने एका तरुणाची गळा चिरून निर्घुण हत्या केल्या प्रकरणातील आरोपीच्या अवघ्या एका तासातच परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी शाखेचे कर्तव्यदक्ष प्रमुख भास्कर केंद्रे यांनी एका तासातच मुसक्या आवळून गजाआड केले. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेने परळी शहर खळबळ माजली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील नांदुरवेस गल्लीतील पुलाजवळ दिनांक ३० एप्रिल च्या सायंकाळी अंदाजे सात ते आठच्या दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून शैलेश राजनाळे वर चाकुने भोसकुन वार करीत गळा चिरून निर्घुण हत्या करण्याचा थरार घडला होता. या घटनेने नांदूरवेस परिसरात एकच खळबळ माजून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र घटनेतील मुख्य आरोपी भैय्या उर्फ प्रशांत बारस्कर हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. आरोपी प्रशांत बारस्कर याचे विषयी पोलिसांकडे कुठलाही थांगपत्ता किंवा सुगावा नव्हता. आशा प्ररिस्थितीत कोणत्याही प्रकरणाचा मोठ्या शिताफीने हातखंडा असणारे डी बी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे यांचेकडे आरोपीचा शोध घेऊन गजाआड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भास्कर केंद्रे यांनी आपल्या पथकातील गोविंद भताने व श्रीकांत राठोड यांना सोबत घेऊन खून प्रकरणातील मुख्य आरोपी भैया उर्फ प्रशांत बारस्कर याची शोधमोहीम सुरू केली आणि अत्यंत शिताफीने नियोजनबद्ध पद्धतीने गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या एका तासातच मुख्य आरोपी प्रशांत बारसकर हा मयतास भोसकून रक्ताने भरलेल्या कपड्यांसह विना मोबाईल गंगाखेड रोडणे डोक्याला कापड बांधून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मुसक्या आवळून जेरबंद केले.
दरम्यान योगेश राजनाळे यांच्या फिर्यादीवरुन परळी शहर पो स्टेशन गुन्हा नोंद क्र. ८६/२०२२ कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद असुन परळीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत यांनी परळीत भेट दिली.
घटना घडल्यानंतर केवळ एका तासातच पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केल्याबद्दल परळी शहर पोलीस ठाणे डि बी शाखेचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!