परळी दि २८ ( लोकाशा न्युज ) :-आपण दररोज बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वारंवार घटना घडत असल्याचे आपण ऐकतो. परळीतील एका शिक्षकाला अशाचप्रकारे फसवणूकीला सामोरे जावे लागुन लालसेपोटी त्या शिक्षकाचे कर्मच फुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे . शेअर मार्केटमध्ये अधिकाधिक फायदा करून देतो ह्या नावाखाली अज्ञात मोबाईल नंबर वरून सदर शिक्षकाची जवळपास १ लाख ५७ हजाराची फसवणूक झाली आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञात मोबाईलधारका विरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी नेताजी शिवाजीराव देशमुख या. स्नेहनगर परळी यांना मो. क्र. ९६६९७८७८१२, ८६०२७२३१२३, ७८६००२३६१८ या अनोळखी मोबाईल नंबर धारकाने फिर्यादीचे मोबाईल क्र. ९८५०६९५५०१ वर फोन करून फिर्यादीस म्हणाले की तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकी बाबत माहिती देवुन शेअर मार्केट मध्ये डी मॉट खाते सुरू करणेसाठी व तुम्हाला शेअर मार्केट मधुन जास्तीत जास्त फायदा होइल असी लालच दाखवुन १ लाख ५७ हजारांची ऑनलाईन फसवणुक केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.
दरम्यान अज्ञात मोबाईल नंबर वरून किंवा ऑनलाईन पद्धतीने अशिक्षित किंवा सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे आपण नेहमी ऐकतो मात्र जे विद्यार्थ्यांना आणि समाजास ज्ञानाची शिकवण देतात असे शिक्षक देखील ऑनलाइन फसवणूकीस बळी पडत असल्याने सुज्ञ नागरिक डोक्यावर हाणून घेत हसावे की की रडावे अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. ही खळबळजनक घटना म्हणजे शहरात चर्चेचा विषय बनली आहे.